अखेर अशरफ निवडणूक लढवणार, Pakistan court allows Raja Pervez Ashraf to contest polls

अखेर अशर्रफ निवडणूक लढवणार

अखेर अशर्रफ निवडणूक लढवणार
www.24taas.com, लाहोर

माजी प्रधानमंत्री राजा परवेज अशर्रफ यांना निवडणूक लढण्याची अनुमती मिळाली. पाकिस्तान कोर्टाने हा महत्वपूर्ण निकाल मानला जात आहे. निवडणूक समितीने भ्रष्टाचाराच्या आरोप लावून अशर्रफ यांचे निवडणूक उमेदवार अर्ज फेटाळला होता.

राजा परवेज अशर्रफ हे ११ मे ला होणाऱ्या निवडणुकीसाठी पात्र असल्याचा हिरवा कंदील कोर्टाने दाखवला आहे. लाहोर उच्च न्यायलयालयीन खंडपीठाच्या म्हणण्यानुसार अशरफ यांच्या विरोधात कोणतेही आदेश नाहीत.

त्यांना निवडणूक लढवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ११ मे ला होणारी निवडणूक ते गृहनगर गुज्जर खान या मतदार संघातून लढवणार आहेत.

First Published: Tuesday, April 23, 2013, 11:41


comments powered by Disqus