Last Updated: Friday, March 8, 2013, 15:05
www.24taas.com,लाहोरपाकिस्तानात शिवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी भारतातून शिवभक्क पाकिस्तानात जाणार आहेत. हिंदूचे श्रद्धास्थान असलेले जत्था येथिल ऐतिहासिक कटास राज मंदिरात शिवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे.
शिवरात्र उत्सवासाठी भारतातून शिवभक्तांची एक तुकडी लाहोरमध्ये पोहचेल. हे हिंदू भक्त वाघा सीमेवरून पाकिस्तानात दाखल होतील. तेथून ते इस्लामाबादमधील चकवाल जिल्ह्यात जातील. हिंदू भक्तांच्या स्वागतासाठी विस्थापीत न्यास संपदा बोर्डचे वरिष्ठ अधिकारी वाघा सीमेवर उपस्थित राहणार आहेत. याबाबतचे वृत्त पीटीआयने दिलं आहे.
या अधिकऱ्यांनी सांगितले की, चकवाल जिल्ह्यात दोन दिवस ते थांबतील. १० मार्च रोजी शिवरात्र निमित्त मंदिरात पूजाअर्चा करतील. या भक्तांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
First Published: Friday, March 8, 2013, 14:04