Last Updated: Sunday, September 29, 2013, 18:28
www.24taas.com, वृत्तसंस्था, मुल्तानपाकिस्तानी अभिनेत्री आरजू खान हिची मुलतान येथे शनिवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडून हत्या केली.
मुल्तान शहरातील एका नाट्यगृहामध्ये सादरीकरण करून आरजू पहाटे घरी परतत असताना ही घटना घडली. हल्ला झाला त्यावेळी आरजू खानची गाडी रेहमानपुरा परिसरातून जात होती. मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी तिच्या गाडीवर गोळ्या झाडल्या. त्यामध्ये ती जागीच ठार झाली. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
आरजूचा मृतदेह कायदेशीर वैद्यकीय कार्यवाहीसाठी निश्तार रुग्णालयात नेण्यात आला आहे. हा हल्ला वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Sunday, September 29, 2013, 18:21