पाकिस्तानी अभिनेत्री सना खानचा अपघातात मृत्यूPakistani actress Sana Khan dies in road accident

पाकिस्तानी अभिनेत्री सना खानचा अपघातात मृत्यू

पाकिस्तानी अभिनेत्री सना खानचा अपघातात मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, कराची

पाकिस्तानी अभिनेत्री सना खान हिचा हैदराबादपासून जवळपास ३० किलोमीटर दूर लूनी कोट जवळ एका रस्ते अपघातात मृत्यू झालाय. एका पाकिस्तानी वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार सना आणि तिचा पती बाबर खान शुक्रवारी आपल्या कारनं कराचीहून हैदराबादकडे रवाना झाले.

बाबरचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि कार पलटी झाली. या अपघातात दोघंही गंभीर जखमी झाले. मोटखे पोलीस आणि अॅब्युलन्स माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. दोघांनाही लियाकत यूनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये जामशोरो इथं दाखल करण्यात आलं. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होण्या आधीच सना खानचा मृत्यू झाला. तर बाबर खान यांची प्रकृतीही अजून गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय.

गेल्या वर्षी डिसेंबर २०१३मध्ये सना आणि बाबर खान यांचा निकाह झाला. सना खाननं `परछाइयाँ` या मालिकेत तर बाबर खाननं `एक तमन्ना लाहासिल से` या मालिकेत काम केलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 9, 2014, 15:43


comments powered by Disqus