पाकचा इन्कार, कार्यकर्ता मागणार कसाबचा मृतदेह, Pakistan’s Burney to claim Ajmal Kasab’s body

पाकचा इन्कार, कार्यकर्ता मागणार कसाबचा मृतदेह

पाकचा इन्कार, कार्यकर्ता मागणार कसाबचा मृतदेह

www.24taas.com, इस्लामाबाद
मुंबई हल्ल्याप्रकरणी आज फाशी देण्यात आलेला क्रुरकर्मा अजमल आमीर कसाबचा मृतदेह घेण्यास पाकिस्तानने नकार दिला असताना पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्ता हा मृतदेह घेण्यासाठी सरसावला आहे.

अन्सार बर्नी असे या मानवाधिकार कार्यकर्त्याचे नाव असून तो भारताकडे या संदर्भात अर्ज करू शकतो. २६/११ हल्ल्यातील दोषी कसाबला बुधवारी सकाळी पुण्याच्या येरवडा जेलमध्ये फाशी देण्यात आली.

बर्नीने ट्विटरवर केलेल्या पोस्ट नुसार कसाबचा मृतदेह पाकिस्तानमध्ये आणण्यासाठी ते आणि त्यांचा ट्रस्ट कसाबच्या कुटुंबाची मदत करू शकतो.

या संदर्भात कसाबच्या परिवाराने बर्नी यांच्या ट्रस्टशी संपर्क साधावा, असे आवाहन बर्नी यांनी कसाबच्या परिवाराला केले आहे.

First Published: Wednesday, November 21, 2012, 19:29


comments powered by Disqus