Last Updated: Thursday, January 2, 2014, 16:15
www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्लामाबाद पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी सुनावणीसाठी न्यायालयात निघालेल्या मुशर्रफ यांच्या छातीत अचानक दुखू लागले त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुशर्रफ यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा खटला सुरू आहे. याच्या सुनावणीसाठी मुशर्रफ न्यायालयात जात होते. सुरक्षेचे कारण देते मुशर्रफ यापूर्वी दोनवेळा सुनावणीसाठी गैरहजर राहिले होते. त्यामुळे यावेळी हजर होण्यासाठी न्यायालयाने त्यांना समन्स बजावले होते. ते घरुन निघाले असता त्यांच्या छातीत दुखू लागेल.
मुशर्रफ यांच्या विरोधात देशद्रोहाचा आणि दिवगंत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांच्या हत्येचा खटला सुरु आहे. मुशर्रफ यांची १९९९ ते २००८ या काळात पाकिस्तानात सत्ता होती.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 2, 2014, 16:09