१६ वर्षांची मुलगी बनली ‘नायक’!, Palestinian girl, 16, becomes youngest minister in the world

१६ वर्षांची मुलगी बनली ‘नायक’!

१६ वर्षांची मुलगी बनली ‘नायक’!

www.24taas.com, झी मीडिया, फलस्तीनी

तुम्ही अनिल कपूरचा नायक हा सिनेमा पाहिलाच असेल... या सिनेमाचा नायक... एक तरुण एका दिवसासाठी मंत्रीपदावर बसतो, अशी या सिनेमाची स्टोरीलाईन... अशीच काहीशी गोष्ट खरोखर घडलीय ती फलस्तीनीमध्ये...

फलस्तीनीमध्ये केवळ १६ व्या वर्षी एक मुलगी मंत्रीपदावर आरुढ होऊ शकलीय... एका मंत्र्यांनं केवळ १६ वर्षांच्या या मुलीला केवळ एका दिवसासाठी मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आणि तिला आपल्या खुर्चीवरही बसवलं.

फलस्तीनी वर्तमानपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसासाठी मंत्रीपदावर आरुढ झालेल्या ‘बशाएर ओथमन’ हिनं फलस्तीनी प्राधिकरणाच्या सरकारच्या स्थानिक प्रशासनातील एक मंत्री म्हणून, संयुक्त राष्ट्राचे महासचिव ‘बान की मून’ यांच्यासमोर अनेक मुद्देही मांडले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ओथमन हिनं गेल्या दोन महिन्यांसाठी आपल्या गृह क्षेत्रातील नगरपालिकेच्या अध्यक्षपदावरही काम केलंय... कदाचित यामुळेच स्थानिक प्रशासन विभागाच्या एका मंत्र्यानं ओथमन हिला तिच्या जन्मदिवशी एका दिवसाचा मंत्री बनण्याची संधी दिली होती.

याचमुळे, बशाएर ओथमन ही आजवरची जगातील सर्वात तरुण मंत्री ठरली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, September 3, 2013, 11:30


comments powered by Disqus