Last Updated: Thursday, April 18, 2013, 13:25
www.24taas.com, इस्लामाबादपाकिस्तानच्या कोर्टाने माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफांना अटक करा असे आदेश दिले. मात्र मुशर्रफ आपल्या खासगी सुरक्षा रक्षकाच्या सोबतीने कोर्ट परिसरातून पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत. मुशर्रफ फरार झाले असल्याचे घोषित करण्यात आले आहे.
जियो न्यूजनुसार इस्लामाबाद उच्च न्यायालयाने अंतरिम जामीनाचा अवधी वाढविण्याची याचिका फेटाळून लावली आणि २००७ मध्ये न्यायाधीशांना बंदी बनविण्याच्या गुन्ह्याविरोधात अटक करण्याचे आदेश दिले. मुशर्रफांनी २००९मध्ये न्यायाधीशांना बंदी केल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याबाबत जामीन मिळविण्यासाठी इस्लामाबाद हायकोर्टात मुशर्रफ पोहचले होते. कोर्टाने त्यांचा जामीन नाकारून अटकेचे आदेश दिले.
मुशर्रफ लष्कर प्रमुख असताना तेथील सरकार बदलले. त्यानंतर मुशर्रफ विदेशात निघून गेले. आणि विदेशात राहिल्यानंतर काही दिवसापूर्वीच पाकिस्तानात परतले होते. याच गुन्ह्याबाबत जामीन मिळावा यासाठी कोर्टात अनेकदा खेटे देखील घालत होते. मात्र त्यांचा जामीन नाकरून त्यांना अटक करा असे आदेश मिळताच, मुशर्रफ फरार झाले. त्यामुळे आता मुशर्रफ यांचा शोध घेण्यात येत आहे.
First Published: Thursday, April 18, 2013, 13:16