Last Updated: Tuesday, March 26, 2013, 07:30
www.24taas.com,कराचीपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ आज पाकिस्तानात परतले. ते दुबईहून कराचीत दाखल झालेत. तालिबानने दिलेल्या धमकीला न घाबरता ते मायदेशात परतलेत. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे समर्थक उपस्थित होते.
तब्बल ४ वर्षानंतर ते पाकिस्तानात परतले आहेत. मुशर्रफ एका मोठ्या सभेला संबोधित करणार असल्याचंही सांगण्यात येतय. या सभेत५० हजारांच्यावर पाकिस्तानी नागरिक सहभागी होतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येतेय. पाक संसद भंग केलेली असताना, आणि काळजीवाहू सरकार स्थापण्याच्या हालचाली सुरु असताना मुशर्रफ यांच्या परतीच्या वृत्तानं पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता अधिक वाढीस लागण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानात मे मध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीत पार्टीसह पूर्ण ताकदीनं मैदानात उतरण्याच्या तयारीत मुशर्रफ असल्याचं मानण्यात येतय. मुशर्रफ यांच्यावर माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो हत्या प्रकरणांसह अनेक प्रकरणांत पाकिस्तानमध्ये खटले सुरु आहेत. अशा स्थितीत मुशर्रफ पाकमध्ये परतल्यास त्यांना अटक होण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत होती.
First Published: Sunday, March 24, 2013, 15:23