`हैयान`च्या विनाशकारी तांडवात १० हजार नागरिकांचा मृत्यू Philippines Typhoon Haiyan: 10,000 dead

`हैयान`च्या विनाशकारी तांडवात १० हजार नागरिकांचा मृत्यू

`हैयान`च्या विनाशकारी तांडवात १० हजार नागरिकांचा मृत्यू
www.24taas.com, वृत्तसंस्था, फिलीपीन्स

फिलिपिन्सला बसलेल्या हैयान या चक्रिवादळानं सुमारे दहा हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला असून वादळानं हजारो जणांना बेघर केलंय. या वादळाचा मोठा फटका मध्यवर्ती फिलिपिन्सलाही बसलाय. आतापर्यंत देशातली ही सर्वात मोठी आपत्ती आहे.

लेयटे बेटावरील टॅक्लोबान शहरात दहा हजारांहून अधिकजण मृत्यूमुखी पडले असून अनेजण गंभीर जखमी झाल्यानं मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. या बेटाची लोकसंख्या २ लाख इतकी आहे. वादळानं बेटावरील विमानतळ पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. शुक्रवारी आलेल्या या वादळाचा सहा बेटांना तडाखा बसला असून सध्या हे वादळ फिलिपिन्सकडून व्हिएतनामकडे सरकलंय.

वादळ्याच्या तिसऱ्या दिवशी अनेक जण मदतीची वाट पाहत आहेत. अमेरिकेनंही सैन्य मदत पूरवणार असल्याचं आश्वासन दिलंय. वादळानं सर्वात जास्त प्रभावित झालेल्या लेयटे बेटाची राजधानी तकलोबान चे पोलीस प्रमुख एल्मर सोरिया म्हणाले की दहा हजार लोकांचा मृत्यू झाला असल्याची शंका आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, November 10, 2013, 17:38


comments powered by Disqus