भौतिकशास्त्रातील नोबेल गॉड पार्टिकलला,Physics Nobel Decleared

भौतिकशास्त्रातील नोबेल गॉड पार्टिकलला

भौतिकशास्त्रातील नोबेल गॉड पार्टिकलला
www.24taas.com , वृत्तसंस्था, स्टॉकहोम

बेल्जियमच्या फ्रांन्झुआ इंगर्ट आणि ब्रिटनच्या पीटर हिग्ज या शास्त्रज्ञांना यावर्षीचा भौतिकशास्त्रातील नोबल पुरस्कार जाहीर झाला आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या शोधातील एक अतिशय महत्वाचा अशा गॉड पार्टिकलचा शोध लावल्याबद्दल फ्रान्झुआ इंगर्ट आणि पीटर हिग्ज या शास्त्रज्ञांच्या जोडीला नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या शास्त्रज्ञांनी ६० च्या दशकात मांडलेल्या हिग्ज बोसान सिद्धांताची पुष्टी या हिग्ज बोसान शोधामुळे झाली. या हिग्ज बोसानला गॉड पार्टिकल असंही संबोधलं गेलं. नोबेल निवड समितीने या शास्त्रज्ञांना नोबेल जाहीर करताना सांगितलं की, या सिद्धांतामुळे हे विश्व का आहे, विश्वाचं आस्तित्व कशासाठी आहे, याची उकल करणं सोपं झाले आहे.

स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या दोन देशांच्या सीमेवर जमिनीखालील बोगद्यात लार्ज हॅड्रॉन कोलायडर म्हणजेच सर्न प्रयोगशाळेत २००८मध्ये करण्यात आलेल्या विस्फोटात हे हिग्ज बोसान सापडले. विश्वाची निर्मिती जशी स्फोटातून झाली, तशीच परिस्थिती एखाद्या प्रयोग शाळेत निर्माण करण्यासाठी हा बिग बँग प्रयोग करण्यात आला. त्यामध्ये या गॉड पार्टिकलचा शोध लागला. पण त्या प्रयोगावर शिक्कामोर्तब व्हायला २०१२ची वाट पाहावी लागली.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, October 9, 2013, 14:09


comments powered by Disqus