Last Updated: Thursday, January 9, 2014, 18:23
www.24taas.com, वृत्तसंस्था, केंटुकीअमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून थंडीने जोर पकडला आहे. महासत्तेलाही नमोहरम करणाऱ्या या थंडीचे जसे तोटे आहे तसा फायदाही झाला आहे. या महाभयंकर थंडीमुळे अमेरिकेतील कारागृहातून फरार झालेला कैदी रक्त गोठविणाऱ्या थंडीने हैराण झाल्यामुळे चक्क पोलिसांना फोन करून शरण आला आहे.
अमेरिकेतील केंटुकी येथील लेक्सिंग्टर तुरुंगातून रॉबर्ट विक (वय ४२) हा कैदी फरार झाला होता. तुरुंगातील कपड्यामध्येच तो फरार झाला. मात्र अचानक थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे रॉबर्ट थंडीसमोर ‘विक’ पडला आणि तो गारठला.
बाहेरील वातवरणापेक्षा त्याला तुरुंगातील वातावरण योग्य वाटू लागले. थंडीत गारठलेल्या रॉबर्टने एका हॉटेलमधून तुरुंगात फोन करुन पोलिसांना कळवले.
रॉबर्टने स्वत: असलेल्या जागेची माहिती दिली आणि मला येऊन घेऊन जा अशी विनंती पोलिसांना केली. रॉबर्ट असलेल्या ठिकाणी पोलीस पोहचले आणि रॉबर्टला गारठलेल्या अवस्थेत पोलिसांनी अटक केले.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, January 9, 2014, 18:23