बराक ओबामांसाठी ती होणार `न्यूड`, Pop queen Madonna support Obama

बराक ओबामांसाठी ती होणार `न्यूड`

बराक ओबामांसाठी ती होणार `न्यूड`
www.24taas.com, वॉशिंग्टन

एखादी व्यक्ती लोकप्रिय असेल तर तिच्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात. अशीच एक गोष्ट अमेरिकेत सध्या चर्चेत आहे. अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी काय पण तयार करण्यास पॉप क्वीन मेडोना सज्ज आहे. तिनेच तसे जाहीर केले आहे. ती ओबामांसाठी `न्यूड` होणार हाय म्हणे.

अमेरिकेच्या राष्ट्रा ध्यक्षपदी बराक ओबामा यांची पुन्हा निवड झाल्यास अमेरिकेत नवा धमाका पाहायला मिळणार आहे. पॉप क्वीन मेडोना स्टेजवर `न्यूड` होऊन आनंद साजरा करणार आहे. स्टेजवर `न्यूड` होण्याची घोषणा मेडोनाने केली आहे, आता बोला.

बराक ओबामा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकून पुन्हा व्हाईट हाऊसमध्ये विराजमान होतील. त्यानंतर स्टेजवर विवस्त्र होऊन आनंद साजरा करणार असल्याचा निर्धार ५४ वर्षीय मेडोनाने केला आहे.

ओबामा यांना मतदान करून जिंकून द्यावे, असं आवाहन मेडोनाने चाहत्यांना केले आहे. देशातील समलैंगिकांच्या अधिकारासाठी ओबामा प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांना देशातील जनतेने पाठिंबा द्यावा, असेही सांगायला मेडोना विसरलेली नाही.

First Published: Friday, September 28, 2012, 14:05


comments powered by Disqus