Last Updated: Friday, March 22, 2013, 17:19
www.24taas.com, जेरूशलेमइस्रायल दौऱ्यावर पोहचलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची गाडी लिमोझीन एअरपोर्टवर अचानक खराब झाली. अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज आणि खूप सारे वैशिष्ट्ये असलेल्या या गाडीला ‘द बीस्ट’ म्हटले जाते.
गाडी खराब होण्यामागे काही जणांची चूक महागात पडले. त्यांनी या गाडीत डिझेलच्या ऐवजी पेट्रोल टाकले. त्यामुळे ती स्टार्टच झाली नाही. त्यामुळे अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसला जॉर्डनहून दुसरी प्रेझिडेंशल लिमोझिन मागविण्यात आली. ओबामा यांना आज जॉर्डनला येणार आहेत. त्यामुळे त्यासाठी ही गाडी तेथे ठेवण्यात आली होती.
गाडी जेव्हा खराब झाली तेव्हा ओबामा या ठिकाणी नव्हते. सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी गाडी खराब होण्याचे कारण सांगितले नाही. तसेच हे पण सांगितले नाही की, गाडीत डिझेलच्या ऐवजी पेट्रोल टाकण्यात आले होते.
संपूर्णपणे बुलेट प्रूफ असलेल्या या गाडीत अध्यक्ष जखमी झाले तर त्यांना रक्त पुरवठा करण्याची विशेष सुविधा आहे, परंतु यात चुकीचे इंधन भरल्याची सूचना देणारी यंत्रणा नाही, यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
या गाडीची किंमत १ कोटी ३५ लाख रुपये आहे. (तीन लाख अमेरिकी डॉलर)
First Published: Friday, March 22, 2013, 17:19