Last Updated: Thursday, August 23, 2012, 23:01
www.24taas.com, लंडनप्रिन्स हॅरीची न्यूड छायाचित्रे सध्या इंटरनेटवर चांगलीच गाजत आहेत मात्र, ब्रिटनने यावर अजून तोंडावर बोट अशीच भूमिका घेतलेली आहे. केवळ राजघराणेच नाही तर, सेलिब्रिटींच्या स्कँडलला वाजवीपेक्षा जास्त प्रसिद्धी देणा-या ब्रिटीश मीडियानेही याबद्दल फार काही गाजावाजा केलेला नाही.
राजकुमार हॅरी महिलेसोबत आपत्तीजनक स्थितीत आढळून आला. वास्तविक आतापर्यंत त्याच्यासोबत असलेली ती महिला कोण होती याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
ब्रिटनच्या राजघराण्याने छायाचित्रात दिसत असलेला हॅरीच असल्याचे मात्र मान्य केले आहे. याशिवाय घटनेबद्दल अधिक कोणतीच माहिती दिलेली नाही.
First Published: Thursday, August 23, 2012, 23:01