प्रिंसेस डायनाचे होते पाकिस्तानी डॉक्टरशी प्रेम संबंध! Princess Diana Was ‘Madly In Love’ With Pakistani Doctor, Wanted A

प्रिंसेस डायनाचे होते पाकिस्तानी डॉक्टरशी प्रेम संबंध!

प्रिंसेस डायनाचे होते पाकिस्तानी डॉक्टरशी प्रेम संबंध!
www.24taas.com, झी मीडिया, न्यू यॉर्क

अमेरिकन मॅगझीन वेनीटी फेअरच्या नव्या अंकात प्रिंसेस डायना आणि पाकिस्तानी हार्ट सर्जन हसनत खान यांच्यातील प्रेमसंबंधाबाबत लेख छापण्यात आलाय.

या लेखानुसार डायनाचं हसनत खानवर प्रेम होतं आणि ती त्याच्याशी लग्न करण्याच्या विचारात होती. हसन खानच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार डायनाला पाकिस्तानची संस्कृती जाणून, समजून घेण्याची इच्छाही होती. इंग्लंड सोडून पाकिस्तानात राहाण्याचाही डायनाचा मनसुबा होता.१९९५ ते १९९७ या काळात प्रिन्सेस डायना आणि हसनत यांच्यात प्रेमसंबंध होते.

माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानी नेता इमरान खान याची पत्नी जेमिमा खान डायनाची मैत्रीण होती. डायनाचं हसनत वर प्रेम असल्याच्या बातमीचा तिनेच खुलासा केला.

डायनाचं हसनतवर अतोनात प्रेम होतं. लग्न करून पाकिस्तानातच हसनतसोबत आयुष्य घालवण्याचा तिचा मानस होता.मात्र हसनने डायनाला लग्नासाठी नकार दिल्यानंतर तिने हसनशी असलेले संबंध तोडले...


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Thursday, August 1, 2013, 21:52


comments powered by Disqus