Last Updated: Sunday, December 9, 2012, 10:45
www.24taas.com,लंडनब्रिटनची प्रिन्सेस केट गरोदर असल्याची माहिती देणाऱ्या भारतीय वंशाच्या जेसिथा सलढाणा या नर्सचा गूढ मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
किंग जॉर्ज रुग्णालयापासून काही अंतरावर तिचा मृतदेह सापडला. तिने आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. जेसिथा मूळची कर्नाटकमधील उडुपी गावातली आहे. ती विवाहित होती आणि तिला दोन मुले आहेत.
बुधवारी पहाटे साडेपाच वाजता ऑस्ट्रेलियातील रेडिओच्या दोन निवेदकांनी रुग्णालयात फोनवरून केटचे सासरे राजकुमार चार्ल्स यांच्या आवाजाची नक्कल करत जेसिथाकडे केटची माहिती विचारली होती. त्यानंतर केट गरोदर असल्याची माहिती रेडिओ निवेदकांना दिली होती. दरम्यान, बनावट फोन करणाऱ्या त्या दोन्ही ऑस्ट्रेलियन रेडिओ निवेदकांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
First Published: Sunday, December 9, 2012, 09:46