वाढलेला पगार कसा खर्च करायचा? राणीला पेच!, queen elizabeth ii gets pay hike

वाढलेला पगार कसा खर्च करायचा? राणीला पेच!

वाढलेला पगार कसा खर्च करायचा? राणीला पेच!
www.24taas.com, लंडन
'कुणाचं काय अन् कुणाचं काय' म्हणतात ना तेच खरं... सामान्य आपला दिवस कसा घालवणार... थोड्याशा पैशात काय विकत घेणार.. या चिंतेत दिसतात... पण, ब्रिटनच्या राणीची ऐटच वेगळी... त्या सध्या वाढलेला पगार खर्च कसा करायचा या विचारात आहेत...

ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या वार्षिक पगारात १५ टक्क्यांची वाढ करण्यात आलीय. त्यामुळे मागच्या वर्षी मिळत असलेल्या वेतनापेक्षा तब्बल पाच मिलियन पौंड (जवळजवळ ४१ करोड रुपये) महाराणीला अधिक मिळणार आहेत.

८० वर्षीय महाराणीला गेल्या वर्षी ३१ पौंड वेतन म्हणून देण्यात आले होते. त्यामध्ये वाढ करून २०१३-१४ या वर्षांसाठी राणीला ३६.१ मिलियन पौंड वेतन मिळणार आहे. ही रक्कम ब्रिटीश सम्राटची संपत्ती असलेल्या क्राऊन एस्टेटच्या लाभाच्या १५ टक्क्यांच्या जवळपास आहे. क्राऊन एस्टेटला आर्थिक वर्ष २०११-१२ साली २४०.२ मिलियन पौंडांचा लाभ झाला होता.
पगार वाढला असला तरी ही रक्कम महाराणी कसा खर्च करणार, हे कोडं मात्र अद्यापही कायम आहे. गेल्या वर्षी महाराणीच्या सेवकांना वेतन म्हणून दहा मिलियन पौंड ( जवळजवळ ८२ करोड रुपये) देण्यात आले होते. क्राऊन एस्टेटच्या माहितीनुसार संपूर्ण देशातील ब्रिटिश संपत्ती जवळजवळ आठ बिलियन पौंड इतकी आहे.

First Published: Friday, April 5, 2013, 11:28


comments powered by Disqus