Last Updated: Thursday, November 28, 2013, 13:08
www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्लामाबाद पाकिस्तानच्या लष्करप्रमुखपदी लेफ्टनंट जनरल राहिल शरीफ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांनी लष्करप्रमुखपदाची नियुक्ती जाहीर केली.
लेफ्टनंट जनरल रशीद मेहमूद यांना ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ कमिटीच्या प्रमुखपदी नेमण्यात आले आहे. पाकिस्तानच्या अध्यक्ष यांनी नव्या नियुक्त्यांना मान्यता दिली. अध्यक्षांचा हा आदेश २८ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. लष्करी कुटुंबातून आलेले ५७ वर्षीय शरीफ यांचे मोठे बंधू १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात मारले गेले होते.
पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दोन्ही अधिकाऱ्यांच्या नावाची शिफारस केली होती. नियुक्तीपूर्वी पंतप्रधानांनी जनरल मेहमूद, चीफ ऑफ जनरल स्टाफ आणि जनरल शरीफ, प्रशिक्षण आणि मूल्यांकनचे महासंचालक यांच्याशी चर्चा केली नियुक्ती जाहीर केली. लेफ्टनंट शरीफ हे अशफाक परवेझ कयानी यांची जागा घेणार आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Thursday, November 28, 2013, 13:08