Last Updated: Thursday, October 25, 2012, 13:23
www.24taas.com,न्यूयॉर्कइनसाईडर ट्रेडिंग प्रकरणी दोषी आढळलेले भारतीय वंशाचे अमेरिकन उद्योजक रजत गुप्ता यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसंच त्यांना ५० लाख डॉलर्सचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
गुप्ता यांच्याविरुद्ध असलेले पुरावे सबळ असल्याचं मत अमेरिकन न्यायाधीशांनी नोंदवलंय. मॅकिन्सेचे माजी प्रमुख असलेल्या गुप्ता यांनी गोल्डमन सॅच या वित्तसंस्थेला कंपनीबाबतची गोपनीय माहिती फोडल्याचा मुख्य आरोप न्यायालयात सिद्ध झाला.
दोन वर्षाच्या शिक्षेनंतरही गुप्ता यांना कोर्टाच्या नजरबंदीखाली एकवर्ष राहावे लागणार आहे. मॅनहॅटन कोर्टाला दिलेल्या साक्षीनुसार गुप्ता म्हणाले की, गेल्या १८ महिने माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप काही बदल झाले आहेत. माझी प्रतिष्ठा पणाला लागली असून कोर्टाचा हा निर्णय माझ्या कुटुंबियांसाठी धक्का देणारा आहे.
रजत गुप्ता यांना २६ ऑक्टोबर २०११ मध्ये अटक करण्यात आली होती. गोल्डमॅन साक्सच्या अतिसंवेदनशील गोष्टी हेज फंड संस्थापक राज राजारत्नम यांच्याजवळ पोहचवून गुप्ता यांनी कंपनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे.
सरकारी पक्षाने रजत गुप्ता यांना याप्रकरणी आठ ते दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्याची मागणी केली होती. रजत यांना हेराफेरीतील तीन प्रकरणात दोषी ठरवण्यात आले. मॅनहॅटन कोर्टाने भारतीय वंशाच्या वकिल प्रीत भरारा यांनी मँकेंझीचे पूर्व प्रमुख हेराफेरी केल्याचा आरोप केला होता. त्याच्या बरोबर एका वर्षानंतर रजत गुप्ता यांना न्यायाधीश जेड रोकेफ यांनी इनसायडर ट्रेडिंग प्रकरणात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याधीसुद्धा एका खालच्या कोर्टाने गुप्ता यांना चार गुन्ह्यांसाठी १५ जूनला तीन आठवड्यांची कैद सुनावली होती.
First Published: Thursday, October 25, 2012, 13:21