रशियातली महिला ठरली ‘मिस लाँगेस्ट लेग्स’!, Rasiyatali woman was Miss lamgesta legs! "

रशियातली महिला ठरली ‘मिस लाँगेस्ट लेग्स’!

रशियातली महिला ठरली ‘मिस लाँगेस्ट लेग्स’!
www.24taas.com, वृत्तसंस्था, रशिया

सायबेरियातील एका ट्रेनी वकिलानं रशियात ‘सर्वात लांब पाय असलेली महिला’ हा पुरस्कार जिंकला आहे. या महिलेच्या पायाची लांबी आहे तब्बल ४२ इंच.

सुत्रांच्या महितीनुसार, रशियाच्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये १८ वर्षाच्या ‘अनासतासिया स्ट्राशेवस्काय’ला ‘मिस लाँगेस्ट’ म्हणून निवडण्यात आलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ५२ महिला स्पर्धकांना मागं टाकत अनासतासियानं १६३३१२.३२ इतकी रोख रक्कम हा पुरस्कारही जिंकला. या स्पर्धेत ‘मिस लाँगेस्ट लेग्स’च्या व्यतिरिक्त मिस बिकनी, मिस स्पोर्ट, मिस स्माईल आणि मिस ब्लॉन्ड सारख्या स्पर्धा देखील होत्या.

आपल्या या विजयानंतर अनासतासियानं प्रण केला आहे की, ती आता खूप येत असलेल्या मॉडेलिंगच्या ऑफरवर लक्ष केंद्रीत करणार नाही. अनासतासिया म्हणाली, शालेय जीवनापासूनच तिला वकील व्हायचं होतं. त्यामुळं तिनं लॉ कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. तसंच ती वकील बनण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहे आणि अनासतासिया ही वकिलीतच करिअर करणार आहे.

मला स्पर्धेत मिळालेली रक्कम ही मी कुटुंबातील लोकांना भेट वस्तू आणि कॅन्सर पीडित लहान मुलांच्या आजारासाठी खर्च करु इच्छिते. मिस लाँगेस्ट लेग्स ही स्पर्धा जिंकल्यामुळं मी खूप आनंदी आहे. कारण, मी ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न बघत होती. तसंच हा विजय माझ्यासाठी स्वप्ना सारखाच आहे. आताही हे स्वप्न पूर्ण झालं यावर विश्वासच बसत नाहीय, असंही अनासतासिया म्हणाली.

अनासतासिया पुढं म्हटते की, माझ्या घरातील लोकांना माझ्यावर गर्व आहे. या स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय हा माझा स्वत:चा होता मात्र मला माझ्या मित्रांनी या स्पर्धेसाठी खूप सहकार्य केलं.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, January 8, 2014, 17:44


comments powered by Disqus