‘डॉल्बी’चा आवाज हरपला!, Ray Dolby, American audio pioneer dies

‘डॉल्बी’चा आवाज हरपला!

‘डॉल्बी’चा आवाज हरपला!

www.24taas.com, झी मीडिया, लॉस एंजेलिस

रेकॉर्डेड आवाजावर नियंत्रण मिळवून हाच आवाज श्रवणीय बनवून प्रेक्षकांपर्यंत पोहचवणाऱ्या ‘डॉल्बी’ या ध्वनीमुद्रण प्रणालीचे जन रे डॉल्बी यांचं सॅनफ्रान्सिस्को इथं गुरुवारी निधन झालंय. ते ८८ वर्षाचे होते.

गेल्या काही महिन्यांपासून रे अल्झायमर आणि श्वेतपेशीच्या कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्या मागे पत्नी डॅगमर, मुले टॉम आणि डेव्हिड आहेत. रे यांचा जन्म अमेरिकेतील पोर्टलँड येथे १९३३ रोजी झाला होता. शालेय जीवनातच ध्वनी कसा निर्माण होतो, याविषयी रे यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. वयाच्या १६ व्या वर्षी ऍम्पेक्स या व्हिडियो टेप रेकॉर्डिंग कंपनीत रे रुजू झाले. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून १९५७ रोजी इलेक्ट्रिक इंजिनियरचा अभ्यासक्रम पूर्ण केला. केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी १९६१ मध्ये पीएचडी घेतली होती. लंडन इथं रे यांनी १९६४ रोजी ‘डॉल्बी लॅबोरेटिज’ या कंपनीची स्थापना केली. त्यानंतर त्यांनी सॅन फ्रान्सिकोमध्येच स्थायिक झाले. ‘संयुक्त राष्ट्र संघाचे सल्लागार’ म्हणूनही रे यांनी भारतात काही वर्ष काम पाहिलं होतं. त्यांनी चित्रपटगृहात वापरण्यासाठी नवी प्रणाली विकसित केली होती. आपल्या आडनावावरून त्यांनी ‘डॉल्बी’ असं तिचं नामकरण केलं.

डॉल्बी यांच्याबद्दलच्या काही उल्लेखनीय गोष्टी...

 नकोशा आवाजाची पातळी (नॉईज) घटविण्याचे तंत्रज्ञान विकसित करणारे डॉल्बी हे दोन ऑस्कर, काही एमी पुरस्कार, एक ग्रॅमी तसेच तंत्रज्ञानविषयक राष्ट्रीय पदकासहित अनेकविध पुरस्कारांचे मानकरी होते.

 ध्वनि (साऊंड) क्षेत्रामध्ये डॉल्बी यांच्या नावावर ५० पेक्षा अधिक स्वामित्व हक्क (पेटंट) नोंदविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितलं.

 संगीत क्षेत्रात भरीवर काम केलेल्या रे यांना ऑस्कर सन्मानासह, प्रतिष्ठेच्या एमी आणि ग्रॅमी पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले.

 याशिवाय त्यांना ` नॅशनल मेडल ऑफ टेक्नॉलॉजी अॅन्ड इनोव्हेशन ` या सन्मानानेही गौरविण्यात आले होते. ध्वनी क्षेत्रामध्ये त्यांच्या नावावर पन्नासपेक्षा अधिक पेटंट नोंदविण्यात आली आहेत.

 मृत्यूसमयी एकूण संपत्ती २.४ अब्ज डॉलर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, September 14, 2013, 14:24


comments powered by Disqus