reach at Delhi only 1 hour, 24taas.com

दिल्ली अब दूर नही, तासाभरात गाठा दिल्ली

दिल्ली अब दूर नही, तासाभरात गाठा दिल्ली
www.24taas.com, लंडन

दिल्ली अब दूर नही... असं म्हणतात, ते आता खरं ठरणार आहे. भारताची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्ये अनेक घटना घडत असतात. आणि त्याकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. आणि आता तुम्हांला दिल्ली गाठण्यासाठी फक्त तासांचा अवधी लागणार आहे.

लंडनहून न्यूयॉर्क किंवा दिल्लीहून लंडन हे अंतर केवळ एका तासात कापता येऊ शकते. अमेरिकन फौजांनी प्रशांत महासागरावर आज घेतलेल्या ‘जेट वेवरायडर’ या हायपरसोनिक वेगाच्या विमानाच्या चाचणीतून हे स्पष्ट झाले. या विमानाने थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६९०० किलोमीटर अंतर फक्त एका तासात पार केले.

प्रवासी विमानातही ही यंत्रणा बसवली तर सध्याच्या जेट विमानांपेक्षाही ती भन्नाट वेगाने झेपावतील हे या चाचणीमुळे समोर आले. वेवरायडर या विमानाची पहिली चाचणी जून २०११मध्ये घेण्यात आली होती, मात्र त्यावेळी ते आपले लक्ष्य पार करू शकले नव्हते.

First Published: Thursday, August 16, 2012, 12:46


comments powered by Disqus