Last Updated: Friday, July 26, 2013, 07:38
www.24taas.com, झी मीडिया, अमर्त्य सेन यांच्यावरुन सुरु झालेलं राजकीय वादळ शमण्याचं नाव घेत नाही. सेन यांनी मोदींवरुन केलेल्या टिप्पणीनंतर भाजपचे खासदार चंदन मित्रा यांनी टिका केलीय..
अमर्त्य सेन हे काँग्रेसी विचारांचे प्रचारक असून ते राजकीय टिकाटिप्पणी करत आहेत. त्यामुळे एनडीएचे सरकार आल्यास त्यांचा `भारतरत्न` हा किताब काढून घ्यायला हवा,` असे मत चंदन मित्रा यांनी व्यक्त केले होते. त्यावर सेन यांनी प्रतिक्रिया देताना, चंदन मित्रा यांचे वक्तव्य वेदनादायी असून त्यांनी असं बोलायला नको होतं, असं म्हटलं.
‘वाजपेयी यांची इच्छा असेल तर आपण भारतरत्न किताब परत करु’ असं सेन यांनी विधान केल्यांन खळबळ माजलीय. १९९८ सालचे नोबेल पुरस्कार विजेते डॉ.अमर्त्य सेन यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात १९९९ ला भारतरत्न मिळाला होता.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Thursday, July 25, 2013, 21:43