Last Updated: Friday, November 22, 2013, 20:25
www.24taas.com, वृत्तसंस्था, लंडन लंडनमधील धक्कादायक बाब उघड झाली आहे. तीन महिलांना ३० वर्षांपासून कोंडून डांबून ठेवण्यात आले होते. त्यांना तीस वर्षांनंतर मुक्त करण्यात यश आहे. आधुनिक ब्रिटनच्या इतिहासातील सर्वांत धक्कादायक हा गुलामीचा प्रकार मानला जात आहे.
मलेशिया निवासी (६९ ), आयलॅंड निवासी (५७) आणि ब्रिटिश महिला (३०) या तिघींना लंडनमधील एका घरात तीस वर्षे गुलामगिरी ठेवण्यात आले होते. या तीन महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. यातील एका महिलेचा जन्म याच घरात झाला. तिचे वय ३० वर्षे आहे. ही महिला ब्रिटिश आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका दाम्पत्याला अटक केली आहे.
सुटका करण्यात आलेल्या महिला अजूनही प्रचंड मानसिक धक्क्यातून बाहेर आलेल्या नाहीत. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहेत. दरम्यान, या दाम्पत्याने बळजबरी करून बंद खोलीत डांबल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांची जानेवारी महिन्यापर्यंत जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.
मानवाधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनिता प्रेम यांच्या फ्रीडम चॅरिटी नावाच्या संस्थेचा कार्यक्रम पाहिल्यानंतर या महिलांमधील आयरिश महिलेने त्यांना दुरध्वनी करून मदतीची विनंती केली. यानंतर संस्थेने पोलिसांशी संपर्क साधला. यावर पोलिसांनी या महिलांची सुटका केली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 22, 2013, 20:25