Last Updated: Wednesday, December 19, 2012, 07:04
www.24taas.com,वॉशिंग्टनअमेरिकेत काय घडेल हे काही सांगता येत नाही. अमेरिकेत सध्या एकच विषय चर्चेचा आहे तो म्हणजे, मिट रोम्नींचा मास्क घालून लुटली बँकेचा.
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक गेल्याच महिण्यात झाली. या निवडणुकीकडे जगाचे लक्ष होते. कारण मिट रोम्नी आणि बरार ओबामा यांच्यात जोरदार मुकाबला होता. या रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार मिट रोम्नी यांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीपासून मिट रोम्नी सर्वांनाच परिचित झाले. याच रोम्नी यांचा मास्क चढवून एका दरोडेखोराने अमेरिकेत चक्क बँक लुटली.
मिट रोम्नी यांचा मास्क घालून आलेल्या या सशस्त्र चोरट्याने व्हर्जिनिया वेल्स फार्गो बँकवर डाका टाकला. वॉशिग्टनच्या उपनगरात असलेली ही शाखा चोरट्याने अचूक हेरून शस्त्राच्या धाकावर बँकेत प्रवेश केला आणि बॅकेतील पाचही टेलर मशीनमधून पैसे गोळा करून पोबारा केला.
बँक लूटून चोरटा पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यामुळे अमेरिकेतील सुरक्षा बोगस असल्याचे यानिमित्ताने पुढे आले. दरम्यान, चा चोरट्याचा माग घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी सुरू केला आहे. बँकेच्या मागेच असलेल्या एका स्टोअर दुकानात पोलिसांनी चौकशी करून रोम्नी यांचा मास्क नुकताच कुणाला विकला होता का याची चौकशी केली.
या आधी अमेरिकत २०१०च्या डिसेंबरमध्ये असाच हिलरी क्लिंटन यांचा मास्क वापरून याच बँकेच्या स्टर्लिंग व्हर्जिनिया शाखेत असाच चोरीचा प्रयत्न केला गेला होता.
First Published: Tuesday, December 18, 2012, 17:54