गावात शेण उचलणारा झाला ११९९ कोटींचा मालक, Rs 1199 crore in the village became the owner of dung-bearing

गावात शेण उचलणारा झाला ११९९ कोटींचा मालक

गावात शेण उचलणारा झाला ११९९ कोटींचा मालक
www.24taas.com, वॉशिंग्टन

जगात असे लोक आहेत की स्वप्नातही ऐश आरामाचे जीवनाचे स्वप्न पाहात नाहीत. मात्र, कधी कधी असा चमत्कार घडतो की, त्यावर विश्वास ठेवणेही शक्य होत नाही. अशीच एक अजब घटना घडली आहे. सर्वधासाधण जीवनजगणाऱ्याला पैशाची लॉटरीच लागलीय. तो एका रात्रीत कुबेर झालाय. ही वास्तवातील घटना आहे. गावात शेण उचलणारा ठरला आहे, ११९९ करोड़ रुपयांचा मालक.

अमेरिकेत मार्च २०१२मध्ये एक मोठा जॅकपॉट (लॉटरी) काढण्यात आला. अमेरिकेतील सर्वात मोठी लॉटरीची रक्कम होती. तीन विजेत्यांना ही मोठी लॉटरी लागली. मात्र, विजेत्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्यांची नावे समजू शकलेली नाहीत. मात्र, गावात नेहमी शेण उचलणाऱ्याचे भाग्य उघडलेय.

तीन विजेत्यांना प्रत्येकी २१८.६ मिलियन डॉलरचे बक्षिस मिळाले आहे. यातील एक विजेता हा कांसासचा आहे. त्याने आपली ओळख लपविलेली आहे. तर दुसरी लॉटरीचे तिकीट तीन शिक्षकांनी घेतले होते. मात्र, त्यांनीही आपली ओळख लपविली आहे. असे असले तरी एक जण पुढे आलाय. त्याला १५७ मिलियन डॉलरची रक्कम देण्यात येणार आहे. गावात शेण उचालणारा हा विजेता आहे. तो ११९९ कोटी रूपयांचा एकटा मालक झाला आहे.

First Published: Wednesday, February 13, 2013, 16:30


comments powered by Disqus