रशियात आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १८ जणांचा मृत्यूRussia station blast: At least 18 dead, head of bom

रशियात आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १८ जणांचा मृत्यू

रशियात आत्मघातकी दहशतवादी हल्ला, १८ जणांचा मृत्यू
www.24taas.com, वृत्तसंस्था, मॉस्को

रशियातल्या व्होलावाग्राडमध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर झालेल्या आत्मघातकी स्फोटात १८ जणांचा मृत्यू झालाय. हिवाळी ऑलिम्पिक तीन दिवसांवर आले असताना रशियातला हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.

रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या मेटल डिक्टेरजवळ हा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी जबरदस्त होती की परिसरात काही काळ केवळ आगीचं तांडव सुरु होतं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिलीय.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या स्फोटाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. या स्फोटातनंतर रशियातले सर्व विमानतळ, रेल्वे स्टेशन तसंच महत्त्वाच्या सार्वजनिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आलीय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 29, 2013, 18:25


comments powered by Disqus