Last Updated: Saturday, April 27, 2013, 13:06
www.24taas.com , झी मीडिया,लाहोर पाकिस्तानच्या तुरूंगात हेरगिरीच्या आरोपाखाली डांबण्यात आलेल्या भारतीय सरबजीतवर कोट लखपत जेलमध्ये काही कैद्यानी प्राणघातक हल्ला केला. जड वस्तूच्या साहाय्याने मारहाण केल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सरबजीत `डीप कोमात` आहे.
जेलमधील कैद्यांना एका तासासाठी बाहेर काढले असता इतर कैद्यांनी सरबजितवर जड वस्तूने प्राणघातक हल्ला केला. कैद्यांनी त्याच्या डोक्यावर हल्ला केल्यामुळे सरबजित गंभीर जखमी झाला आहे. तो कोमात असून त्या कारणास्तव त्याच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नसल्याची डॉक्टरांनी माहिती दिली. त्याला तेथील जिना रूग्णालयात दाखल केले असून अतिदक्षता विभागात ठेवणयात आले आहे.
‘सरबजीत सिंहाची देखभाल करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, तो सध्या वेंटिलेटरवर आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. नसांच्याद्वारे शरीराच्या आत औषध दिले जात आहे. या माहितीला माहिती विदेश मंत्रालयातचे प्रवक्ता सैय्यद अकबरूद्दीन यांनी यांनी दुजोरा दिलाय.
सरबजीत गेली अनेक वर्षे पाकिस्तानी तुरूंगात हेरगिरीच्या आरोपीखाली खितपत पडून आहे. सरबजीतच्या दया याचिकाही पाकिस्तानी न्यायालय आणि माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी फेटाळली होती. सरबजीतला २००८ साली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती परंतु त्यावर पाकिस्तान सरकारने अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली आहे. त्या ठिकाणी १७ हजार कैदी असून याआधी ही असे हल्ले झाले आहेत.
First Published: Saturday, April 27, 2013, 11:35