सरबजीतला परदेशात नेण्यास पाकची मनाई, Sarabjit Singh in deep coma

सरबजीतला परदेशात नेण्यास पाकची मनाई

सरबजीतला परदेशात नेण्यास पाकची मनाई
www.24taas.com, झी मीडिया,इस्लामाबाद

पाकिस्तानमध्ये कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरबजीत सिंगला उपचारासाठी परदेशात नेण्यात येणार नाही. त्याच्यावर पाकिस्तानमध्येच उपचार केले जाणार आहेत.

सरबजीत सिंगच्या प्रकृतीचा आढावा घेण्यासाठी नेमण्यात आलेल्या चार डॉक्टरांच्या पॅनलने त्याला उपचारासाठी परदेशात नेण्याची शिफारस केली होती. ही शिफारस पाकिस्तान सरकारनं धुडकावून लावलीये. सरबजीत अजूनही कोमात असून त्याची अवस्था अत्यंत गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

सरबजीत सिंहच्या कुटुंबीयांनी पाकिस्तानात जाऊन हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या सरबजीतची भेट घेतली. सरबजीतची पत्नी, बहिण आणि दोन मुली यांनी काल दुपारी वाघा बॉर्डरवरुन पाकिस्तानात प्रवेश केला. सरबजीत सिंहची प्रकृती अद्यापही गंभीर आहे.

शुक्रवारी रात्री काही कैद्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. सरबजीत सध्या कोमामध्ये आहे. सरबजीतला सध्या वेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. या हल्ल्यामागं पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय.

First Published: Monday, April 29, 2013, 13:59


comments powered by Disqus