सरबजीत सिंगचा मेंदू मृत, प्रकृती नाजूक, Sarabjit Singh may be brain dead: Report

सरबजीत सिंगचा मेंदू मृत, प्रकृती नाजूक

सरबजीत सिंगचा मेंदू मृत, प्रकृती नाजूक
www.24taas.com, झी मीडिया, लाहोर

पाकिस्तानी जेलमध्ये बंदी असणारा भारतीय कैदी सरबजीत सिंगला केलेल्या मारहाणी मुळे त्यांच्या मेंदूला जबर दुखापत झाली होती. आणि त्यामुळेच त्याचा मेंदू काम करीत नसल्याचे समजते आहे. पाकिस्तानमधील लाहोरच्या जिन्ना हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं आहे. मात्र सरबदजीतचं मेंदू मृत झाल्याच्या बातमीनंतर त्याचे कुटुंबिय भारताता परतत आहेत.

सरबजीतला व्हेंटिलेटरवरून देखील लवकरच हटविण्यात येणार आहे. सरबजीतची बहीण त्याची पत्नी आणि दोन मुली ह्या भेटण्यासाठी पाकिस्तानमध्ये गेल्या आहेत. २६ एप्रिलला सरबजीतवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याविरोधात पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी दोन कैद्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आणि ह्या दोन्ही कैद्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे. सरबजीतवर काही कैद्यांनी वीट आणि ब्लेडने हल्ला केला होता.


सरबजीतच्या दया याचिका माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ आणि कोर्टने फेटाळली होती. २००८ मध्ये सरबजीतची फाशी अनिश्चित काळापर्यंत स्थगित करण्यात आली होती.

First Published: Tuesday, April 30, 2013, 14:55


comments powered by Disqus