शनीला आणखी एक चंद्र मिळाला? Saturn got another moon?

शनीला आणखी एक चंद्र मिळाला?

शनीला आणखी एक चंद्र मिळाला?
शनीला आणखी एक चंद्र मिळाला असल्याचं सांगण्यात येत आहे. शनीचा दुसरा चंद्र म्हटल्या जाणाऱ्या या बर्फाळ, छोटय़ा उपग्रहाला `पेगी` असे नाव देण्यात आलं आहे. नासाच्या कॅसिनी अंतराळयानाने शनीच्या या नवीन चंद्राचा म्हणजेच नैसर्गिक उपग्रहाचा शोध लावला आहे.

याविषयी इकारस या नियतकालिकात हा शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. पेगीला हे नाव मरे यांनी त्यांची सासू पेगी हिच्यावरून दिले आहे, शनीचे चंद्र कसे निर्माण होतात याची माहिती मिळेल.

शनीच्या बाहेरच्या कडय़ांपैकी सर्वात चमकदार कडय़ात तो अर्धा मैल अंतरात फिरत आहे. या चंद्राच्या गुरुत्वाचा परिणाम शनि ग्रहाच्या एरवी सुरळीत असलेल्या रचनेवर काही प्रमाणात परिणाम होत असावा. हा गूढ पदार्थ तेथे असल्याचा पुरावा शनीच्या बाहेरच्या चमकदार व मोठय़ा कडय़ातील काही बदलांच्या आधारे टिपण्यात आला आहे. या कडय़ाची लांबी ७५० मैल व रूंदी सहा मैल असून ते कडे अपेक्षेपेक्षा २० टक्के जास्त चमकदार दिसते.

हा गोळ्यासारखा पदार्थ १५ एप्रिल २०१३ रोजी कॅसिनीच्या कॅमेऱ्यात बद्ध झाला आहे म्हणजे या गोष्टीला जवळपास वर्ष पूर्ण झाले आहे. पेगी हा उपग्रह इतका छोटा आहे की, तो कॅसिनी यानाला थेट दिसणे शक्य नाही व नासा वैज्ञानिकांना त्याचे जवळून दर्शन २०१६ मध्ये घडणार आहे कारण त्यावेळी कॅसिनी यान या चमकदार कडय़ाजवळून जाणार आहे. शनीला सध्या ५३ अधिकृत चंद्र आहेत व नऊ हंगामी चंद्र आहेत ज्यांची खात्री पटायची आहे.

खगोलवैज्ञानिकांच्या मते शनिच्या कडय़ातील बर्फ कक्षेत विखुरले गेल्याने हे चंद्र बनले असावेत. शनीचे तरूण चंद्र हे लहान आहेत हा सिद्धांत मानला तर पेगी हा त्याचा नवा चंद्र आहे. हा पदार्थ कडय़ातून बाहेर पडतो व नंतर त्याचे चंद्र म्हणून अस्तित्व बनताना आम्ही कदाचित पाहत आहोत, यासारखी घटना पूर्वी कधी बघितली ,असे लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठाचे खगोलवैज्ञानिक कार्ल मरे यांनी म्हटलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 17, 2014, 21:54


comments powered by Disqus