‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला म्हणून 32 वर्षांची शिक्षा, Saudis lashed, jailed for Valentine’s party

‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला म्हणून 32 वर्षांची शिक्षा

‘व्हेलेंटाईन डे’ साजरा केला म्हणून 32 वर्षांची शिक्षा

www.24taas.com, झी मीडिया, रियाद

सौदी अरेबियात पाच लोकांना प्रत्येकी 39 वर्षांची कैद आणि 8000 चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आलीय. त्यांचा गुन्हा फक्त इतकाच की त्यांनी तीन महिन्यांपूर्वी 14 फेब्रुवारीला ‘व्हेलेंटाईन डे’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीत सहभाग घेतला होता.

तीन महिन्यांपूर्वी ‘व्हेलेंटाईन डे’निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या एका पार्टीमधून पाच जणांना अटक करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मुलींसोबत दारु पिताना आणि नाचताना पकडण्यात आलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार, 14 फेब्रुवारी रोजी बुरैदा कासिम प्रांतातील अल-फारुक भागात पोलिसांनी एका घराची झाडाझडती घेतली होती. या घरात पाच पुरुष आणि सहा महिला वेलेंटाईन पार्टीचं सेलिब्रेशन करताना दिसले.

पोलिसांनी पाच पुरुषांवर अनोळखी महिलांशी संबंध ठेवणं आणि दारु पिण्याच्या आरोपाखाली अटक केली होती. यातील पाच पुरुषांना तब्बल 32 वर्षांची शिक्षा सुनावली गेलीय. सहा महिलांना मात्र अजून शिक्षा सुनावण्यात आलेली नाही.

सौदी अरेबियात शरिया कायद्याचं पालन करणं प्रत्येक व्यक्तीसाठी अपरिहार्य आहे. शरिया कायद्यानं प्रत्येक व्यक्तीनं सक्तीनं पालन करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समितीही बनवण्यात आलीय. या समितीच्या लोकांकडे, इतर लोक व्हेलेंटाईन डेसारख्या पश्चिमी संस्कृतीपासून लांब राहावेत याची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आलीय. सोबतच ही समिती दारु आणि ड्रग्जच्या व्यापाराविरुद्धही काम करते.

सौदी अरेबियात, एकत्र फिरणाऱ्या पुरुष-महिलांना आपांपसात नातं असणं गरजेचं आहे. महिला नेहमीच बुरखा घालतील तसच सार्वजनिक ठिकाणी धुम्रापन करणार नाहीत, हेदेखील सुनिश्चित करण्याची जबाबदारी याच समितीकडे सोपवण्यात आलीय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 11, 2014, 10:04


comments powered by Disqus