...जेव्हा धबधब्यातून कोसळणारं पाणीही गोठतं!, Scenery of frozen waterfall in Lushan Mountain

...जेव्हा धबधब्यातून कोसळणारं पाणीही गोठतं!

...जेव्हा धबधब्यातून कोसळणारं पाणीही गोठतं!
www.24taas.com, बीजिंग

चीनच्या लुशान पर्वतावरून धो धो वाहणारा धबधबा कडाक्याच्या थंडीमुळे पार गोठून गेलाय.

उत्तर भारतासह राज्यात थंडीची लाट पसरलीय. भारताचा शेजारी देश असलेल्या हिमालयापलीकडच्या चीनमध्येही या थंडीचा चांगलाच परिणाम दिसून येतोय. इथंही कडाक्याच्या थंडीचा सामान्य जनजीवनावर झालेला परिणाम दिसून येतोय. इथल्या थंडीची कल्पना येण्यासाठी लुशान पर्वतावरून वाहणाऱ्या धबधब्याचं उदाहरण बरंच काही सांगून जातंय.

हा वाहणारा धबधबा थंडीमुळे अक्षरश: थांबलाय. खाली कोसळणाऱ्या अवस्थेतच पाण्याचं बर्फात रुपांतर झालंय. आणि हेच दृष्यं पाहण्यासाठी सध्या पर्यटकांनी इथं एकच गर्दी केलीय. एकीकडे धबधबा गारठला असताना अशा पाण्यात उड्या माऱण्याच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत.

First Published: Thursday, January 10, 2013, 10:01


comments powered by Disqus