सूर्यापेक्षा मोठा तारा सापडला scientist search big star than sun

सूर्यापेक्षा मोठा तारा सापडला

सूर्यापेक्षा मोठा तारा सापडला

www.24taas.com, वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

सूर्यापेक्षा १५ पटीनं मोठा आणि शौरी तारकापुंजात राहणारा एक भला मोठा तारा काही वैज्ञानिकांनी शोधून काढलाय. हा तारा वायू आणि धुळीच्या मिश्रणातून जन्माला आलाय. आहे. विशेष म्हणजे आपला सूर्य जेथे जिथं जन्माला आलाय तिथंच या ताऱ्यानं जन्म घेतलाय.

चिलीमध्ये ताऱ्यांच्या कक्षा आणि अवकाशात घडणाऱ्या रासायनिक प्रकियांचा नीट अभ्यास केला गेला. यावेळी २३ ताऱ्यांचा अभ्यास करत असताना, मॅक्डनॉल्ड वेधशाळेतील हारलान जे. स्मिथ दुर्बिणीतून एचडी 162826 हा सूर्यासारखा तारा शोधण्यात आला. सूर्यापेक्षा 15 पटीनं मोठा असलेला हा तारा सूर्यापासून 110 प्रकाश वर्ष दूर नक्षत्रमालेत आढळलाय.

यामुळे, आता आपल्या सुर्यासारखे अजून किती सुर्यमाला अवकाशात आहेत. हे आता शोध घेणे अधिक महत्वाचे ठरणार आहे. टेक्सास विद्यापीठाचे इव्हान रामीरेझ यांनी म्हणण्यानुसार, `या सुर्याचा शोध अतिशय महत्त्वाचा आहे. कारण, या सूर्याच्या अभ्यासाने आपला सूर्य कसा जन्माला आला, हे आपण समजून घेऊ शकतो. तसेच पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण कशी झाली? आपण ज्या जीव सृष्टीवर राहतो... तशाच प्रकारची दूसरी जीवसृष्टी परग्रहावर किंवा इतर सुर्यमालेतील दुसऱ्या ग्रहावर अस्तित्वात आहे का? हा शोध घेण्यात खूपच जास्त मदत होणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 11, 2014, 16:04


comments powered by Disqus