बरं का, तुर्कस्तानमध्ये समुद्रातून धावणार रेल्वे !, sea rail in Turkey

बरं का, तुर्कस्तानमध्ये समुद्रातून धावणार रेल्वे !

बरं का, तुर्कस्तानमध्ये समुद्रातून धावणार रेल्वे !
www.24taas.com, वृत्तसंस्था, इस्तंबूल

जगातील पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू करण्यात आला आहे. तुर्कस्तानने आशिया आणि युरोप या दोन खंडांना जोडणारा पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू केलाय.

हा रेल्वेमार्ग काळ्या समुद्राला मरमरे समुद्राशी जोडतो. हा जगातील सर्वाधिक खोल रेल्वे मार्ग आहे. काही महत्त्वपूर्ण पुरातत्त्व शोधांमुळे हा मार्ग पूर्ण होण्यासाठी आठ वर्षे लागली.

जगातील पहिला समुद्रातील रेल्वेमार्ग सुरू करून १०० पेक्षाही अधिक वर्षांपासूनचे स्वप्न सत्यात आणले आहे. तुर्कस्तान सरकारने प्रजासत्ताक दिनाला ९०वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपती अब्दुल्ला गुल व पंतप्रधान रीसेप तैयप एर्दोगिन यांच्या उपस्थितीत रेल्वेचे उद्‌घाटन झाले.

या लोकल रेल्वेमुळे इस्तंबूलला वाहतूककोंडीपासून काहीसा दिलासा मिळेल, अशी आशा तुर्कस्तानच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. समुद्रामध्ये ट्यूबसारखी रचना करून त्याला बोगद्याचे स्वरूप देण्यात आले आहे. बोगद्याच्या ट्यूब लवचिक साहित्यांनी जोडण्यात आल्यामुळे ते जोरदार धक्‍केही सहन करू शकतात.

भूकंपादरम्यान इस्तंबूलमधील ही सर्वांत सुरक्षित जागा असणार आहे. प्रवाशांचा वेळ वाचविणे व सुरक्षितता असे रेल्वेचे उद्दिष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. रेल्वेमार्गाचे वैशिष्ट्य २००५मध्ये रेल्वेमार्गाच्या कामाला सुरवात रेल्वेमार्गावरील या बोगद्याची लांबी १३.६ किलोमीटर या मार्गावरील रेल्वेतून ७५ हजार प्रवासी तासाला प्रवास करतील दिवसभरात किमान १०लाख प्रवासी प्रवास करू शकतील.

नऊ रिश्‍टर स्केल क्षमतेचा भूकंप सहन करण्याची बोगद्याची क्षमता यापूर्वीचा प्रयत्न आटोमन सुल्तान अब्दुल मजीद यांनी सुमारे १५० वर्षांपूर्वी पहिल्यांदा असा बोगदा बनविण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांचे उत्तराधिकारी अब्दुल हमीद यांनी १८९१ मध्ये बोगद्याचे डिझाईन तयार करून घेतले होते; मात्र त्याला मूर्त स्वरूप देता आले नाही. बोगद्याची निर्मिती रेल्वेमार्गाच्या बोगद्याची निर्मिती म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा आविष्कार मानला जात आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 2, 2013, 17:26


comments powered by Disqus