Last Updated: Monday, March 24, 2014, 09:15
www.24taas.com, वृत्तसंस्था, बीजिंगआठ मार्चपासून बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचं गुढ अजूनही उकलेललं नाही. याबाबत रोज नवनवे खुलासे समोर येतायत. आज १० विमानं हिंदी महासागरात बेपत्ता विमानाचा शोध घेत आहेत.
या विमानाचे काही अवशेष हिंदी महासागरात असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोन एबॉट यांनी केला होता. आता फ्रान्सच्या उपग्रहांनी घेतलेल्या छायाछित्रातही या बेपत्ता विमानाच्या ढिगाऱ्याशी संबधित काही वस्तू दिसून आल्या आहेत.
हिंदी महासागरात शोध घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाकडे आता ही छायाचित्रं सोपवली जाणार आहेत. याचदरम्यान, चीनलाही अशीच छायचित्र मिळाल्यानं बेपत्ता झालेल्या मलेशियन विमानाचं गूढ उकलण्याची दाट शक्य़ता आता निर्माण झाली आहे. एखाद्या विमानाच्या शोधासाठी पहिल्यांदाच जगभरातून इतक्या मोठ्याप्रमाणात शर्थीचे प्रयत्न केले जातायत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, March 24, 2014, 09:15