ट्युनिशियात वेगळाच वाद , याला म्हणतात `सेक्स जिहाद`!, Sexual Jihad in Tunisia

ट्युनिशियात वेगळाच वाद , याला म्हणतात `सेक्स जिहाद`!

ट्युनिशियात वेगळाच वाद , याला म्हणतात `सेक्स जिहाद`!
www.24taas.com, झी मीडिया, ट्युनिशिया

सीरियामध्ये लढणा-या इस्लामी जिहादींशी शारीरसंबंध ठेवून गरोदर राहाणाऱ्या ट्युनिशियन महिलांचा सहभाग वाढत आहे. या प्रकाराला सेक्स जिहाद असं म्हणण्यात येत आहे. जिहादींशी शरीरसंबंध ठेवून त्यांच्या मुलांना जन्म देणं हा ही जिहादच असल्याचं सांगण्यात येत असून ही जुनी प्रथा असल्याचंही म्हणण्यात येत आहे.

सेक्स जिहादमध्ये ट्युनिशियातील महिलांनी सहभाग घेतल्याची माहिती ट्युनिशियाच्या मंत्र्यांनीच दिली. लोट्फी बिन जेद्दो असं या मंत्र्यांचं नाव आहे. सीरियामध्ये इस्लामी राजवटीसाठी जिहादी लढत आहेत. ट्युनिशियामधून अनेक महिला सीरियामध्ये गेल्या आहेत. या महिला जिहादींशी शरीर संबंध ठेवत आहेत. प्रत्येक महिला साधारण ३० ते १०० योद्ध्यांशी शरीरसंबंध ठेवत असल्याची माहिती ट्युनिशियातील मंत्र्यांनीच स्वतः दिली असल्याचं आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांनी सांगितलं आहे.

इस्लाममध्ये जिहाद अल निकाह म्हणजे सेक्स्युअल होली वॉर अशी प्रथा असल्याचा दावाच मंत्र्यांनी केला आहे. या सेक्स जिहादमुळे सीरियामध्ये गर्भवती होऊन ट्युनिशियात परत आलेल्या महिलांची संख्या वाढत आहे. नेमक्या किती महिला सीरियातून परतल्या आहेत, याबद्दल माहिती देण्यात येत नाही. तसंच सीरिया गेलेल्या महिला या जिहादासाठीच गेल्या असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र हा सेक्स जिहाद असल्याचं आता समोर येऊ लागलं आहे. बऱ्याचशा महिला या लढण्यासाठी गेल्या नसून शरीरसंबंध ठेवण्यासाठी गेल्या असल्याची माहिती मिळताच आता तेथील सीमासुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुमारे सहा हजार तरूण-तरुणींना सीरियामध्ये जाण्यापासून थांबवण्यात आल्याची माहितीही जेद्दो यांनी दिली.

काही तज्ज्ञांच्या मते सुन्नी मुस्लीम सलाफिस्ट या कट्टर विचारधारेनुसार एकाचवेळी अनेक इस्लामी योद्धयांशी विवाहबाह्य संबंध ठेवण्यास मंजुरी देणारा ‘जिहाद अल निकाह’ ही योग्य प्रथा आहे. तसा फतवादेखील काढण्यात आल्याचे वृत्त असले तरी असा फतवा काढण्यात आल्याची अफवाच होती असे ट्युनिशियाच्या मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Sunday, September 22, 2013, 18:17


comments powered by Disqus