Last Updated: Tuesday, March 25, 2014, 19:14
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईया वेळी आपण ऑफिसमध्ये आहात, स्कूल किंवा कॉलेजमध्ये आहात, घरात किंवा प्रवासात आहेत. काही वेळ थांबा. जरा चेक करा तुम्ही किती धाडसी आहे. किती भीती तुमच्या मनात आहे. हे चेक करण्यासाठी हवेत केवळ दोन मिनीटं... कारण दोन मिनिटात पाहाल तुम्ही एक हॉरर शॉर्ट फिल्म... या फिल्मचे नाव आहे लाइट्स आऊट....
ही कहाणी एका मुलीची आहे. जी झोपायला चालली आहे. झोपायला जाण्यापूर्वी ती आपल्या घरातील लाइट बंद करते. पण लाइट बंद केल्यानंतर जे काही होते. ते तुम्हांला बऱ्याच काळापर्यंत आठवणीत राहील.
ही शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले आहे शॉर्ट फिल्ममेकर डेव्हिड सँडबर्ग यांनी. या फिल्ममध्ये मुलीची भूमिका वढवली आहे अभिनेत्री लौटा लॉस्टन हिने....
फिल्ममध्ये तरुणी बाथरूममधून बेडरूममध्ये येत असते. लाइट बंद करते त्यावेळी तिला काही तरी दिसतं. डबल चेक करण्यासाठी ती लाइट चालू बंद करते. ती भास समजून पुन्हा बेडरूमध्ये येते. पण याठिकाणी वीजेचा खेळ सुरू राहतो. फिल्मची विशेषतः तिचा शेवट आहे.
ही फिल्म ट्विटरवर खूप शेअर केली जात आहे. एकाने या बद्दल लिहिले की, हे भगवान, ही फिल्म खूपच भीतीदायक आहे.
पाहा व्हिडिओ•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, March 25, 2014, 18:47