लंडनमध्ये `जो बोले सो निहाल`, सैनिक म्हणतो `पगडीसाठी कायपण`, Sikh Soldier in London army

`जो बोले सो निहाल`, सैनिक म्हणतो `पगडीसाठी कायपण`

`जो बोले सो निहाल`, सैनिक म्हणतो `पगडीसाठी कायपण`
www.24taas.com, लंडन

ब्रिटिश आर्मीतील अनेक भारतीय शीख तरूण कार्यरत आहे. मात्र तरीही त्यांच्या धर्माविषयी वाटणारी आस्था त्यांनी सोडलेली नाही. याचेच उदाहरण लंडनमध्ये पाहायला मिळालं आहे. फरकॅपऐवजी प्रथमच पगडी वापरण्याची परवानगी मिळणार्‍या शीख सैनिकाला त्याच्या दाढी आणि पगडीमुळे त्याच्या सहकार्‍यांकडून अपमानित व्हावे लागल्याने त्याने ‘जो बोले सो निहाल’चा नारा दिला आहे.

लंडनच्या रॉयल आर्मीतील एका बिटिश शीख सैनिकाला पहिल्यांदाच त्यांच्या गणवेशाचा एक भाग असलेल्या लांबलचक फरकॅप (बीअरस्कीन) टोपीऐवजी पारंपरिक शीख पगडी वापरण्याची सूट देण्यात आली होती. या सैनिकाचे नाव जतिंदर पालसिंह भुल्लर (२५) असे असून त्याला शेकडो वर्षांची रॉयल आर्मीची परंपरा मोडून बकिंगम पॅलेसच्या बाहेर अंगरक्षक म्हणून पगडीमध्ये तैनात राहण्याची खास मुभा देण्यात आली होती.

आपणाला पगडी घातल्याने आणि दाढी व केस राखल्याने वारंवार सहकार्‍यांकडून टोमणे आणि कुचेष्टेचा सामना करावा लागतो. आपल्या सहकार्‍यांसोबतच मार्च करताना शाही फरटोपीशिवाय सलामी देणारे ते पहिलेच सैनिक ठरणार असल्याने येथे वादंग निर्माण झाला आहे. त्यांना मिळालेल्या मुभेमुळे संपूर्ण कंपनी पर्यटक आणि शाही पाहुण्यांसमोर हास्यास्पद ठरू शकते असे स्कॉट गार्डच्या अधिकार्‍यांचे मत आहे.

ही रेजिमेंट १८३२ पासून परेडमध्ये सैनिकी गणवेशाचा भाग असलेली फरकॅप वापरते. परंतु या इतिहासाला गालबोट लागण्याची भीती वेलिंग्टन बराकीच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. स्कॉट गार्ड रेजिमेंट असोसिएशनचे वरिष्ठ अधिकारीही या घटनेमुळे नाराज आहेत.

First Published: Tuesday, December 4, 2012, 09:19


comments powered by Disqus