जेव्हा अजगराने क्षणात मगरीला फस्त केलं, snake and crocodile story

अजगराने क्षणात मगरीला फस्त केलं

अजगराने क्षणात मगरीला फस्त केलं
www.24taas.com, झी मीडिया, ऑस्ट्रेलिया

तुम्ही कधी अजगराला मगर खातांना पाहिलं आहे का?, कारण एका अजगराने थेट एका मगरावरचं ताव मारला.

ऑस्ट्रेलियातील क्वीसलँड भागातील मुंडरा तलावात, एक अजगर वीजेच्या वेगाने बाहेर आला आणि तलावाच्या किनाऱ्यावर अजगराने मगरीला चारही बाजूने घट्ट वेढा दिला.

मगराने अजगराच्या वेढ्यातून सुटण्याचा अटोकाट प्रयत्न केला, पण काहीही फायदा झाला नाही, अजगराने काही वेळाने मगराला पोटात टाकलं.

मगर खाल्ल्यानंतर अजगराचा आकार दुप्पट झाला. आपलं अन्न पचवण्यासाठी अजगर पुन्हा झुडपांमध्ये गडप झाला.

हे सर्व दृश्य एका महिलेने आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आहे. टीफनी कार्लिस असं या महिलेचं नाव आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 14:59


comments powered by Disqus