ओसामाचा खात्मा करणाऱ्या कमांडोची हत्या Sniper who killed osama, murdered

ओसामाचा खात्मा करणाऱ्या कमांडोची हत्या

ओसामाचा खात्मा करणाऱ्या कमांडोची हत्या
www.24taas.com, वॉशिंग्टन

आंतरराष्ट्रीय स्तरावरील आंतकवादी आल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन याची २ मे, २०११ रोजी अमेरिकन सैन्याने हत्या केली होती. लादेनची हत्या करण्यात अमेरिकन सैन्याच्या ज्या नेव्ही कमांडोने मोलाची भूमिका निभावली होती, त्या सील कमांडो क्रीस केल याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांना एका माजी नौदल सैनिकानेच गोळ्या घातल्या.

क्रीस केल याची हत्या करणाऱ्या एडी रे रूथ या माजी नौदल सैनिकाला अटक करण्यात आलं आहे. रुथला मानसिक आजार आहे. त्याला पोस्टट्रॉमेटिक स्ट्रेस सिंड्रम नामक मानसिक आजार आहे. टेक्सासमधील क्रीक लॉज शुटिंग रेंजमध्ये केलचा मृतदेह आढळला होता.

केलने आपल्या कारकीर्दीत १५९ दहशतवाद्यंचा खात्मा केला होता. सर्वाधिक दहशतवादी मारण्याचा अमेरिकन विक्रम त्याच्या नावावर जमा होता. त्याचं चरित्र ‘अमेरिकन स्नायपर’ या नावाने पुस्तकरुपात प्रकाशित झालं होतं. केलने १९९९ ते २००९ असं एक दशक नौदलात काम केलं होतं. त्यानंतर क्राफ्ट इंटरनॅशनल ही फर्मही सुरू केली होती. ‘स्नायपर’ या नावाने अमेरिकेत केल प्रसिद्ध होता.

First Published: Monday, February 4, 2013, 17:35


comments powered by Disqus