स्नोडेन व्हेनेझुएलाला आश्रय घेण्यास तयार?, Snowden ready to shelter in venezuala

स्नोडेन व्हेनेझुएलाला आश्रय घेण्यास तयार?

स्नोडेन व्हेनेझुएलाला आश्रय घेण्यास तयार?
www.24taas.com,झी मीडिया,मॉस्को

अमेरिकेच्या गुप्त कारवाया तसंच अनेक गोपनीय दस्तावेज जाहीर करणारा एडवर्ड स्नोडेननं अखेर व्हेनेझुएलामध्ये आश्रय घ्यायला तयारी दर्शवलीय. रशियन संसदेकडून ही माहिती देण्यात आलीय. अमेरिकेच्या दबावानंतरही व्हेनेझुएलानं स्नोडेनला राजनैतिक शरण द्यायची तयारी दर्शवली होती.

'आमच्या अपेक्षेप्रमाणेच स्नोडेननं व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांचं निमंत्रण स्वीकारलंय... प्रत्यक्षात स्नोडेनलाच हा पर्याय विश्वसनीय वाटलाय' असं रशियन संसदेच्या आंतरराष्ट्रीय समितीचे अध्यक्ष अॅलेक्सी पुश्कोव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलं होतं.

परंतु, काही वेळातच ही पोस्ट काढून टाकण्यात आली. ‘मला स्नोडेनच्या या निर्णयाची बातमी रशियाच्या सरकारी टिव्ही चॅनेल 'वेस्टी २४'कडून मिळालीय’ असा नवा संदेश पुश्कोव यांनी ट्विटरवरुन दिला. व्हेनेझुएला, निकारगुआ आणि बोलिवियाने या देशांनी स्नोडेनला शरण देण्याची तयारी दर्शविली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 10, 2013, 14:47


comments powered by Disqus