Last Updated: Sunday, August 19, 2012, 19:45
www.24taas.com, नवी दिल्लीपाकिस्तानातील काही घटक सोशल साईट्सचा गैरवापर करुन भारतातला सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रय़त्न करत आहेत. त्याबाबत भारतानं पाकिस्तानला जाब विचारला आहे.
केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पाकिस्तानचे गृहमंत्री रहेमान मलिक यांना याबाबत विचारणा केली. अफवा पसरविणाऱ्या पाकिस्तानातील घटकांवर तिथल्या सरकारनं कारवाई करवी अशी मागणीही भारतानं केली आहे.
सोशल साईट्स गैरवापर करुन भारतात अशांतता पसरविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अशी देखील पाकिस्तानकडे भारताने तक्रार केली आहे.
First Published: Sunday, August 19, 2012, 19:45