सोनिया गांधींनी टाकलं मिशेल ओबामांनाही मागे!, Sonia Gandhi topples michelle obama

सोनिया गांधींनी टाकलं मिशेल ओबामांनाही मागे!

सोनिया गांधींनी टाकलं मिशेल ओबामांनाही मागे!

www.24taas.com, न्यूयॉर्क

`फोर्ब्स मॅग्झीन`ने जगातील शक्तीशाली शंभर महिलांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांच्या पत्नी मिशेल ओबामांना मागे टाकलंय.

मिशेल ओबामा या सातव्या स्थानावर आहेत. तर जर्मनीच्या चान्सलर एंजेला मर्केल या सलग दुस-या वर्षी पहिल्या स्थानावर कायम आहेत. सोनिया गांधी यांच्यासह पेप्सिको कंपनीच्या चेअरमन आणि सीईओ इंद्रा नूरी बाराव्या स्थानी आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ चंदा कोचर 59व्या क्रमांकावर आहेत. बायोकॉनच्या संस्थापक किरण मझुमदार - शॉ फोर्बसच्या यादीत 80 व्या क्रमांकावर आहेत.

सोनिया गांधी जरी सहाव्या स्थानावर असल्या, तरी त्यांच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोपही सतत होत असल्याचं आणि ते सोनिया गांधींना रोखण्यात अपयश येत असल्याचं फोर्ब्सने नमूद केलं आहे. तसंच, अजूनही त्यांना नव्या तरुण वर्गाचा पुरेसा पाठिंबा नसल्याचं फोर्ब्समध्ये म्हटलं आहे.

First Published: Thursday, August 23, 2012, 13:17


comments powered by Disqus