Last Updated: Saturday, March 30, 2013, 23:45
www.24taas.com, सिऊलदक्षिण आणि उत्तर कोरियामधला तणाव अधिक वाढलाय. दोन्ही देशांमध्ये `युद्ध स्थिती` निर्माण झाल्याचं कम्युनिस्ट राजवट असलेल्या उत्तर कोरियानं म्हटलंय.
सीमेवर अजून कुठलीही हालचाल दिसत नसली, तरी कुठल्याही क्षणी ठिणगी पडू शकते, असं मानलं जातंय. उत्तर कोरियानं एका अर्थी अमेरिकेलाच आव्हान दिलंय. अमेरिकेनंही हे विधान गांभिर्यानं घेतलंय.
कोरियातल्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काऊंसिलनं म्हटलंय... दुसरीकडे दक्षिण कोरियानं मात्र गेल्या 10 दशकांपासून दोन्ही देश युद्धाच्याच स्थितीत असल्याचं सांगत या धमकीला भीक घालत नसल्याचं स्पष्ट केलंय...
First Published: Saturday, March 30, 2013, 23:45