`सिवोल` जहाज दुर्घटनेच्या मृतांची संख्या वाढली south korian sheep sunk, death increase

`सिवोल` जहाज दुर्घटनेच्या मृतांची संख्या वाढली

`सिवोल` जहाज दुर्घटनेच्या मृतांची संख्या वाढली
www.24taas.com, झी मीडिया, दक्षिण कोरिया

दक्षिण कोरियाच्या जलरक्षकांनी समुद्रात बुडालेल्या जहाजातून १० अजून मृत शरीरे बाहेर काढले आहेत. अधिकाऱ्यांच्या सांगण्यानूसार आता मृत लोकांची संख्या ४९ इतकी झाली आहे.

समुद्रात सध्या पाण्याचा प्रभाव जोरात आहे. तसंच हवामान खराब असल्यानं रक्षकांना मृतदेह शोधण्यास अडचण होत आहे. तीन दिवसांच्या अथक शोधानंतर काही मृतदेह सापडलीत.

अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, ३०० पेक्षा जास्त लोक हरवले आहेत किंवा मृत झालेले आहेत. जहाजाचे कॅप्टन ली जून सियोग याला संशयित तसंच गरजेच्या वेळी लोकांची मदत न करण्याच्या आरोपावरुन अटक करण्यात आली आहे. तसंच एका महिलेला देखील अटक करण्यात आली आहे. महिलेनं जहाज चालवता येत नसतांना आणि पाण्याचा प्रवाह जोरात असताना जहाज चालवण्याचा प्रयत्न केला होता.

आतापर्यंत या दुर्घटनेत ४९ लोकांचा मृत्यू तसंच २५३ प्रवासी बेपत्ता आहेत. यात अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जलरक्षकांना सध्या ६८२५ वजनाच्या `सिवोल` जहाजाच्या आत शिरण्यात यश मिळालंय. परंतू शक्तीशाली फ्लॅशलाईट असून देखील रक्षकांना समुद्रात काहीच दिसत नाहीय. तसंच पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळं जलरक्षकांना आता जास्त काळजी घेऊन शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 20, 2014, 18:47


comments powered by Disqus