Last Updated: Thursday, July 25, 2013, 12:02
www.24taas.com, झी मीडिया, सॅन्टीएगो दि कॉम्पोस्टेलास्पेनमध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेत ६० लोकांचा बळी गेला असून १०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. रेल्वे रूळावरून घसरल्याने हा अपघात झाला.
स्पेनमधील दक्षिण भागातील सॅन्टीएगो दि कॉम्पोस्टे येथे स्थानिक वेळेनुसार ८.४२ वाजता (भारतीय वेळेनुसार १२.१२ मिनिटांनी)हा अपघात झाला. रेल्वेमध्ये २१८ प्रवासी आणि कर्मचारी होते. स्पेनमध्ये झालेल्या रेल्वे अपघातातील सर्वात मोठा अपघात आहे. १११ जखमी लोकांची ओळख पटली आहे.
अपघात झालेली ट्रेन वेगात होती. या वेगामुळे रेल्वेचे चार डब्बे रूळावरून घसल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भिषण होता की, रेल्वेचे डब्बे एकावर एक असे चढलेत. त्यानंतर डब्ब्यांना मोठी आग लागली. त्यानंतर धुरांचे लोट हवेत पसरलेत.
स्पेनमध्ये ख्रिश्चन महोत्सव सुरू आहे. हजारो लोक या महोत्वसासाठी रेल्वने प्रवास करीत होते. २००४ साली माद्रिद येथे रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १९१ जणांचा बळी गेला होता. त्याच अपघाताची आठवण करून देणारा हा अपघात आहे असे एका अधिकाऱ्यांने सांगितले.
फोटोफीचर स्पेन भीषण रेल्वे अपघात
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, July 25, 2013, 11:22