श्रीलंकेने करून दाखवल, भारताला प्रवेश नाही SRILANKA DO IT BUT INDIA DIDN`T

श्रीलंकेने करून दाखवल, भारताला प्रवेश नाही

श्रीलंकेने करून दाखवल, भारताला प्रवेश नाही
www.24taas.com, झी मीडिया, हम्बानटोटा

`श्रीलंकन एअरलाइन्स` आता `वन वर्ल्ड` या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक क्षेत्रातील संघटनेत सामील झाली आहे. पण भारत यात कुठेच नसल्याचं चित्र दिसत आहे. या संघटनेत सहभागी झालेली `श्रीलंकन एअरलाइन्स` ही आशियातील पहिलीच एअरलाइन्स आहे.

दक्षिण श्रीलंकेत हम्बानटोटा येथील मत्तला राजपक्ष आंतरराष्ट्रीय विमानतळावर `वन वर्ल्ड` आणि `श्रीलंकन एअरलाइन्स` यांच्यात भागीदारीचा करार करण्यात आला.

`श्रीलंकन एअरलाइन्स` आधी २१ देशांत ३२ शहरांमध्ये विमानसेवा पुरवत आहे. पण आता `श्रीलंकन एअरलाइन्स` 150 देशात सुमारे एक हजार शहरांना विमानसेवा पुरवणार आहे. या कारणाने आता श्रीलंकेतील पर्यटन व्यवसाय फारच वाढणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत आपला टक्का देखील आता श्रीलंका वाढवणार आहे.

या बाबत बोलताना श्रीलंकन एअरलाइन्सचे अध्यक्ष निशांथ विक्रमसिंहो यांनी सांगितले की, ‘वन वर्ल्ड’ मध्ये सहभागी झाल्यामुळे श्रीलंका हवाई वाहतूक आणि पर्यटन जागतिक नकाशावर आले आहे. या कारणाने आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक तर आम्ही वाढवणार आहोत, तसेच पर्यटकांची संख्या वाढण्यासही आमच्या देशाला मोठा हातभार लागणार आहे.

`वन वर्ल्ड`मध्ये श्रीलंकन एअरलाइन्सने प्रवेश केला असला तरी, `एअर इंडिया`ला अजूनही `वन वर्ल्ड`मध्ये प्रवेश मिळालेला नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 1, 2014, 19:24


comments powered by Disqus