९० वर्षांनी उलगडलं रामानुजनच्या पत्रातलं रहस्य Srinivasa Ramanujan`s cryptic formula finally proved

९० वर्षांनी उकललं रामानुजनच्या पत्रातलं रहस्य

९० वर्षांनी उकललं रामानुजनच्या पत्रातलं रहस्य
www.24taas.com, लंडन

वयाच्या जेमतेम बत्तिसाव्या वर्षी गणिताच्या क्षेत्रात असाधारण कामगिरी करून या जगाचा निरोप घेणाऱ्या श्रनिवास रामानुजन यांनी मृत्यूशय्येवर असताना गणिताचा एक सिद्धांत मांडला होता. 90 वर्षं या सिद्धांतावर डोकं लढवल्यानंतर अखेर गणितज्ज्ञांना या सिद्धांताचा उलगडा झाला आहे.

1920 साली रामानुजन मृत्यूशय्येवर असताना त्यांनी आपले ब्रिटिश गुरू गणितज्ज्ञ जी एच हार्डी यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात रामानुजन यांनी अनेक नव्या गणिती फंक्शन्सच्या रूपरेष मांडल्या होत्या. या गणिती सुत्रांबद्दल त्यापूर्वी कधीही कुणी ऐकलं नव्हतं. हे सूत्र कुणाला सुचलंही नव्हतं. या पत्रातच रामानुजन यांनी हे गणिती सुत्र कसं वापरावं, याची माहिती दिली होती.

एका अहवालानुसार गणितज्ज्ञांना आत्ता कुठे या सुत्रांचा उलगडा झाला आहे. या सुत्रांवर गणित सोडवल्यावर गणितज्ज्ञांनी एकमुखाने मान्य केलं, की रामानुजन यांनी जगाला सुचवलेलं गणिती सुत्र एकदम बरोबर होतं. या सुत्राच्या आधारावर खगोलशास्त्रातील गणितंही सोडवता येऊ शकतात. ब्लॅक होलचं गणितही या सुत्राने सोडवलं जाऊ शकतं.

एमोरी युनिव्हर्सिटीचे गणितज्ज्ञ केन ओनो यांनी यासंदर्भात विधान केलं आहे की, रामानुजन यांच्या रहस्याने भरलेल्या त्या पत्रातील गूड उकललं असून ते एक महान गणिती सूत्र असल्याचं स्पष्ट झालं आहे. जगभरातले अनेक गणितज्ज्ञ या सुत्रावर गेली ९० वर्षं अभ्यास करत होते, तेव्हा कुठे या सुत्रातून गणितं सोडवणं शक्य झालं. यावरूनच रामानुजन यांच्या असामान्य बुद्धीमत्तेचा अंदाज येऊ शकतो.

First Published: Tuesday, January 1, 2013, 15:40


comments powered by Disqus